Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पीओपी वापराबाबत अभ्यास गट स्थापन करणार – केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची शिष्टमंडळाला ग्वाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 18 डिसेंबर : पर्यावरणाचे रक्षण ही झाले पाहिजे आणि गणेश, दुर्गा मुर्तीचे कारखानदार, मुर्तीकार, कारागीर जगले पाहिजे. म्हणून पीओपीच्या मुर्तींबाबत अभ्यास करुन तोडगा काढण्यासाठी अभ्यासगट नियुक्त करण्याची मागणी आज शिष्टमंडळाने केली ती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मान्य केली, अशी माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केंद्र सरकारने पीओपी वापरावर बंदी आणली आहे. यावेळी कोरोनामुळे एक वर्षासाठी पीओपीवरील बंदी शिथिल करण्यात आली होती. आता पुढील वर्षी काय होणार? हा प्रश्न आहे. मोठ्या गणेश मुर्ती कशा साकारणार? तसेच शाडू मातीची मुर्तीला अनेक मर्यादा आहेत, याबाबत मुर्तीकार, कारखानदार चिंतेत होते. त्यामुळे त्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुंबईत भेट घेतली.यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अँड नरेश दहिबावकर, महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव आणि त्यांचे पदाधिकाऱ्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

यावेळी झालेल्या बैठकीत शिष्टमंडळाने सांगितले की, पीओपीवर बंदी घातली तर गणेशमुर्तीकार, कामगार, कारागीर यांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. कोरोना मुळे यावेळी हा उद्योग अडचणीत आहे त्यामुळे याबाबत सहानुभूती पुर्वक विचार करण्याची गरज आहे. आज नव्या तंत्रज्ञानानुसार पीओपीची मुर्ती विरघळवता येते. त्याचा वापर करुन पर्यावरण पुरक पीओपीची मुर्ती घडविता येते. त्यामुळे याबाबत अभ्यास गट स्थापन करावा व मध्यममार्ग निघावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. ती मंत्री जावडेकर यांनी मान्य केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.