बार्टी व एमसीईडी गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक महिन्याचे ई – सेवा (मल्टिसर्व्हिसेस ) प्रशिक्षण संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मासिक (ई – सेवा मल्टिसर्व्हिसेस ) प्रशिक्षण कार्यक्रम आस्था कॉम्पुटर इन्स्टिट्यूट अहेरी येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. २८ फेब्रुवारी ते २८ मार्च २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या प्रशिक्षणात अनुसूचित जातीतील युवक-युवतींसाठी अनिवासी व मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या उपक्रमात एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. एस. बेझलवार कॉलेज चे प्राचार्य डॉ. रवींद्र हजारें होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी.विभागीय अधिकारी mced पुणे डॉ.अभिराम डबीर , प्रकल्प अधिकारी के. पी . टाकळे , कार्यक्रम समन्वयक अंकुश बोरकर , ई सेवा शिक्षक संजय सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रास्ताविक के. पी. टाकळे यांनी केले. त्यांचबरोबर यांनी विद्यार्थ्यांना भावी उद्योजक होण्यासाठी प्रेरणा दिली.
डॉ. अभिराम डबीर यांनी अद्ययावत राहून प्रगती साधण्याचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. रवींद्र हजारें सर यांनी उद्योगातील चढ-उतारांना सामोरे जाऊन यश मिळविण्याचे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा दरम्यान पवन खनके सर, राजेश बावणे , अविनाश नगराळे यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी विशेष मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी आभार प्रदर्शन अंकुश बोरकर यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.

