Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कांग्रेस चे वरिष्ठ नेता मोतीलाल वोरा यांचे निधन

मोतीलाल वोरा हे 93 वर्षाचे होते उद्या त्यांचा जन्म दिवस होता 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नई दिल्ली डेस्क 21 डिसेंबर:- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचे आज  वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मोतीलाल व्होरा यांचे गांधी परिवार सोबत जवडचे संबंध होते. मोतीलाल व्होरा हे मध्य प्रदेशच्या राजकारणातील मोठे नाव आहे. काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत मोतीलाल व्होरा यांचा मोठा वाटा राहीलेला आहे. काही वर्तमानपत्रांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. 1972 मधील विधानसभा निवडणूक जिंकून त्यांनी मध्य प्रदेशाच्या विकासासाठी प्रयत्न केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या मंत्रिमंडळात 1983 मध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. लगेच दोन वर्षांनी म्हणजेच 1985 साली त्यांनी मध्य प्रदेशच्या मुंख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा केंद्रीय राजकारणाकडे वळवळा आणि 1998 च्या लोकसभेमध्ये राजनांदगाव या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली.

मोतीलाल व्होरा यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. व्होरा यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक सच्चा कार्यकर्ता, काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहणारा नेता गमावला, असे म्हणत राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले.

Comments are closed.