Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लातूर जिल्ह्यातील सुपुत्राला सीयाचीन सीमेवर आले अपघाती वीरमरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

सियाचीन सीमेवर २० डिसेंबर रोजी बीएसएफ च्या गाडीत गस्त घालत असतांना गाडीचा तोल ढासळून ती एका खोल दरीत पडल्याने ४ जवानांचे अपघाती वीरमरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क : दि. 21 डिसेंबर 2020

लातूर जिल्ह्यातील सुपुत्राला सीयाचीन सीमेवर गस्त घालत असतांना वीरमरण आलंय. निलंगा तालुक्यातील उमरगा हडगा या गावातील ३५ वर्षीय नागनाथ अभंग लोभे सियाचीन सीमेवर २० डिसेंबर रोजी बीएसएफ च्या गाडीत गस्त घालत होते. त्यांच्यासोबत इतरही ०४ जवानही होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र त्यांच्या गाडीचा तोल ढासळून ती एका खोल दरीत पडली. त्यात नागनाथ अभंग लोभे यांच्यासहीत सर्व जवानांना अपघाती वीरमरण आलं. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील असा परिवार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदरील जवानाचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी त्यांचे मुळ गाव उमरगा हडगा इथे आणण्यात येणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. मात्र शहीद जवानाचे पार्थिव नेमकं कधी येणार ही माहिती अद्यापपर्यत त्यांच्या नातेवाईकांनाही मिळू शकली नाही. दरम्यान शत्रू राष्ट्रापासून आपल्या सीमांचे रक्षण करीत असतांना लातूर जिल्ह्यातील जवानाला वीरमरण आल्याने त्यांच्या गावी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.