Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतला कुरखेडा पं. स. मध्ये विकासकामांचा आढावा..

Get real time updates directly on you device, subscribe now.

कूरखेडा 29-आक्टो – पंचायत समिति सभागृहात जि प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली पं.स अधिकारी कर्मचारी यांची आढावा सभा घेण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना जी प अध्यक्ष म्हणाले, तालूक्यात विकास कामाची आखणी करताना अधिकारी ग्रामसचिव पदाधिकार्याना विश्वासात घेत नाही अशी वारंवांर होणारी तक्रार विकासकामात अडथळा निर्माण करणारी आहे . अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी व लोकप्रतिनिधीना विश्वासात घेऊनच वाटचाल करावी अशी सूचणा जि प अध्यक्ष अजय कंकडलवार यांनी केली.

या प्रसंगी जि. प .उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, माजी जि प उपाध्यक्ष जिवन पाटील नाट, जि प सदस्य प्रभाकर तूलावी, प्रल्हाद कराडे, भाग्यवान टेकाम, गिता कूमरे नाजूक पूराम, प स सभापति सूनंदा हलामी, उपसभापति श्रीराम दूगा, प स सदस्य गिरीधर तितराम, मनोज दूनेदार बौद्धकूमार लोनारे ,संध्या नैताम शारदा पोरेटी, कविता गूरनूले, संवर्ग विकास अधिकारी अनिता तेलंग, ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष महेन्द्र देशमुख, बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कूकडे ,उपविभागीय सिंचाई अभियंता मनोहर कूंभारे, बांधकाम विभागाचे उपअभियंता धार्मिक, गटशिक्षण अधिकारी रविंद्र शिवनकर, कक्ष अधिकारी वाघूले, विस्तार अधिकारी मांडरेवार, आदि उपस्थित होते यावेळी कृषी , बांधकाम, सिंचाई,शिक्षण, पंचायत विभागातील कामांचा विभागवार आढावा घेण्यात आला . यावेळी अनेक कामाबाबत समाधानकारक उत्तर संबंधित अधिकारी व ग्रामसेवकाकडून न मीळाल्याने सभाध्यक्षानी नाराजी प्रकट करीत कामात सूधारणा करण्याची सूचणा केली अन्यथा कार्रवाई ची तंबी सूद्धा दिली कार्यक्रमाचे संचालन शिक्षण विस्तार अधिकारी वाय आर टेभूंर्णे तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी डि पी भोगे यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.