Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिंगणघाट नजीक झालेल्या भीषण अपघातात ४ युवकांचा करूनअंत तर ४ गंभीर जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

नागपूर तालुक्यातील हिवरा हिवरी गावातील ९ तीर्थकरू गणपतीपुळेला बोलेरोने जात होते.

सोमवारी रात्री हिंगणघाट नजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बोलेरोच्या झालेल्या भीषण अपघातात नागपूर जिल्ह्यातील हिवरा हिवरी गावातील ४ युवकांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर ४ गंभीर जखमी झाले आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हिंगणघाट, दि. ५ जानेवारी: नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील हिवरा हिवरी गावातील ९ तीर्थकरू युवक वाहन चालकासह गणपतीपुळे या तीर्थस्थानावर जाण्यासाठी काल रात्री बोलेरो गाडीने निघाले होते. मात्र नियतीला वेगळेच काहीतरी मंजूर होते. प्रवास सुरु झाल्यानंतर आपल्यातील ४ व्यक्ती सोडून जाणार याची पुसरशी कल्पना सुद्धा त्यांना आली नसेल. नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी लिहून होते.

सोमवारी रात्रीच्या सुमारास बोलेरो गाडीने ते आपल्या गावाहून निघाले होते. मात्र ७० ते ७५ किमी चा प्रवास केल्यानंतर हिंगणघाट राष्ट्रीय महामार्गावरील उभ्या असलेल्या ट्रकला बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री १०.३० च्या दरम्यान घडली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हा अपघात इतका भिषण होता की बोलेरो समोरून चकनाचुर झाली तसेच क्षतिग्रस्त बोलेरो काढण्याकरीता क्रेनची मदत घ्यावी लागली. अपघाताची माहिती होताच परिसरातील हिंगणघाट पोलीस घटना स्थळी दाखल झाले. आणि त्यांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढिल उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले तर एकावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर अपघाताची माहिती मृतकांचा नातेवाईकांना देण्यात आली.    

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.