Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपूर महानगर पालिकेच्या आज झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदी भा. ज. प. चे उमेदवार विजयी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि. ५ जानेवारी: नागपूर महानगर पालिकेच्या आज झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदी भा. ज. प. चे उमेदवार विजयी झालेले आहेत. महापौर पदी दयाशंकर तिवारी तर उपमहापौर पदी मनिषा धावडे हे निवडून आलेले आहे. महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत दयाशंकर तिवारी यांनी महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार रमेश पुणेकर यांचा पराभव केला. महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत दयाशंकर तिवारी यांना 107 मते मिळाली तर कॉंग्रेसचे उमेदवार रमेश पुणेकर यांना 27 मते मिळाली तर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार नरेंद्र वाळदे यांना 10 मते मिळाली तर उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भा. ज. पा. च्या मनिषा धावडे या निवडून आलेल्या आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या कॉंग्रेसच्या उमेदवार रश्मि धुर्वे यांचा पराभव केला. मनिषा धावडे यांना 107 मते मिळाली तर रश्मि धुर्वे यांना 26 मते मिळाली तर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला 10 मते मिळाली.

नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उर्वरित कालावधीसाठी ऑनलाईन पद्धतीने ही निवडणूक घेण्यात आलेली होती. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही निवडणूक घेण्यात आली. विद्यमान महापौर संदीप जोशी व उपमहापौर मनीषा कोठे यांनी त्यांचे पदाचा राजीनामा दिल्यामुळे उर्वरित काळासाठी महापौर व उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी काम बघितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.