Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अ-हेर नवरगाव ग्रामपंचायत उमेदवारांचा प्रचार शांततेत, मैत्रीपूर्ण वातावरणात जोरात सुरू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपुर 11 जानेवारी:- 15 जानेवारी 21 रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराचे रणसिंग उमेदवारांनी आपापल्या आराध्य दैवताला नारळ फोडून प्रचार कार्याची सुरुवात केली. अ-हेर नवरगाव ग्रामपंचायतीमध्ये एकूण पाच प्रभागातून 13 वॉर्ड मेंबर जनतेला निवडून द्यावयाचे आहेत. प्रभाग क्रमांक एक व पाच यामध्ये दुहेरी काट्याची लढतअसून प्रभाग क्रमांक दोन, तीन सरळ सरळ व चार मध्ये तिरंगी लढत आहे. पहिल्यांदाच बच्चू कडू यांची प्रहार समर्थक संघटना उभी असून या पॅनलमध्ये नव चैतन्याचे उमेदवार आप आपली शक्ती पणाला लावून उभे ठाकले आहेत.

काही प्रभागांमध्ये उभे असलेले उमेदवार हे मागील पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत झालेले असून परत ते उभे राहून आपल्या मागील पराभवाचा वचपा काढतील काय याकडे गावातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. प्रचार करताना परस्पर गटातील उमेदवार रस्त्यामध्ये भेटतात तेव्हा हसत हसतच ते एकमेकांना शुभेच्छा देऊन पुढील प्रचारासाठी वाटचाल करीत असतात.
सध्या मैत्रीपूर्ण वातावरणात, शांततेत गावातील उमेदवारांचा प्रचार सुरू आहे.
प्रचारादरम्यान असलेली गावातील नीरव शांतता निवडणूक पार पडे पर्यंत राहो असे येथील जनतेला वाटत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.