Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लाहेरीत पोलिसांनी केली मकर संक्रांत साजरी

लाहेरी पोलिसांनी ग्रामस्थांना तीळ गुळ देऊन मकर संक्रांत केली साजरी.

लाहेरी उप पोलीस स्टेशन तर्फे मकर संक्रांती निमित्त गावामध्ये फिरून ग्रामस्थांना तीळ-गुळाचे लाडू वाटप करण्यात आले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भामरागड 15 जानेवारी:- महाराष्ट्रातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आदिवासीबहुल आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात देखील हा सण साजरा केला जातो. काही वर्षांपूर्वी लोक एकमरकांचे घरी जाऊन तीळ व गुळ या आरोग्यवर्धक मिश्रणाचे वाटप करून हा सण साजरा करत असत. परंतु कार्यमग्नता वाढल्याने तसेच समाज माध्यमांचा प्रत्येक बाबतीत शिरकाव झाल्याने आजकाल हा सण देखील समाज माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊनच साजरा होत असल्याचे दिसून येते. परंतु अतिमागास भामरागड तालुक्यातील आदिवासी बहुल लाहेरी येथील एका प्रसंगाने आपल्या जुन्या आठवणीस उजाळा मिळेल.

लाहेरी उप पोलीस स्टेशन तर्फे मकर संक्रांती निमित्त गावामध्ये फिरून ग्रामस्थांना तीळ-गुळाचे लाडू वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत मध्ये उपस्थित ग्रामसेवक चव्हाण व स्टाफ सह सामान्य नागरिकांचे देखील तोंड गॊड करण्यात आले. तर लाहेरी येथे बसने भामरागड ला जाणाऱ्या परगावहून आलेल्या नागरिकांचे देखील तोंड गोड करण्यात आले. व सर्वाना शांतता व सौहार्दाचा जणू संदेश च या निमित्ताने लाहेरी पोलिसांनी दिला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारतामध्ये या सनादिवशी सर्वजनच विशेषकरून महिला वर्गामध्ये अधिक आनंदाचे वातावरण असते. तर सिंधी समुदाय आजचे दिवशी आपापले मुलींना गोड मिठाई पाठवून सण साजरा करतात. खगोलशास्त्रीय, भाषीय, भौगोलिक, सांस्कृतिक, पारंपरिक, धार्मिक या सर्वांचे प्रतिनिधित्व करणारा सण म्हणजे मकर संक्रांती. आजचे दिवशी सूर्य कर्क राशीमधून मकर राशी मध्ये प्रवेश करतो आणि दिवस रात्रीचे प्रमाण व्यस्त व्हायला सुरुवात होते. देशातील भौगोलिक वैविध्य असलेल्या, आपापला सांस्कृतिक, पारंपरिक ठेवा चे जतन करत सर्वसामान्य शेतकरी- मजुरापासून ते अगदी श्रीमंतांपर्यंत सर्व च वर्ग हा सण साजरा करतात.
खासकरून पिकांची कापणी-चुरणी झालेचे आनंदात शेतकरी बांधव हा सण साजरा करतात.
राज्यनिहाय पाहिले तर आजचे सणाला कुठे मकर संक्रांती तर कुठे लोहरी, पोंगल, बिहू, सुग्गी हब्बा, घुंघुटी, उत्तरायण, ई नावाने ओळखले जाते. तर नेपाळ मध्ये हा सण माघी संक्रांती म्हणून साजरा केला जातो.

Comments are closed.