Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Corona Vaccination:- मुंबईत लसीकरण मोहीम सुरु

Get real time updates directly on you device, subscribe now.

आहारतज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना मुंबईत पहिली लस देण्यात आले.

 राज्यातील 285 केंद्राद्वारे लसीकरण मोहिम राबवली जाणार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई डेस्क 16 जानेवारी:- मुंबईच्या बीकेसी लसीकरण केंद्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी लसीकरण मोहीमेचे शुभारंभ करण्यात आले. लसीकरणास सुरुवात झाली असली तरी संकट अजूनही टळलेलं नाहीय असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. लसीकरणानंतरही मास्क घालणं, सओशल डिस्टन्सिंगचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. आज आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत. अनेकदा आपण काही शब्द वापरतो, त्या शब्दाचा अर्थ असतो किंवा नसतो. पण एक प्रथा म्हणून वापरत असतो. पण आज मी जो शब्द वापरला आहे, क्रांतिकारक पाऊल या शब्दाबद्दल कोणाचेही दुमत असण्याची अजिबात शक्यता नाही आहे.राज्यातील 285 केंद्राद्वारे लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आहारतज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना मुंबईत पहिली लस देण्यात आली. तर डॉ मनोज पासांगे यांना दुसरी लस मिळाली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही लस टोचली जात असताना कोरोना योद्ध्यांजवळ उभ्या होत्या. याआधी नायर रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत राहिलेल्या पेडणेकरांनी लस टोचण्याची तयारी दर्शवली होती.  सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.