Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपूरच्या तरुण निर्मात्यांनी तयार केलेला ब्लंकेट चित्रपट फिल्म बाझार इंडिया दिल्ली इथे प्रदर्शित, नागपूरकरांसाठी गौरव

१६ ते २१ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या ह्या चित्रपट महोत्सवात जगातील २०० चित्रपटांची ऑनलाईन प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर 16 जानेवारी:- एन. एफ. डी. सी. तर्फे आयोजित फिल्म बाझार इंडिया दिल्ली इथे 16 जानेवारी 2021, म्हणजे आजपासून सुरु झालेल्या चित्रपट महोत्सवात नागपूरच्या तरुण फिल्म निर्मात्यांनी ‘ब्लंकेट’ (कंबल) या चित्रपटाच्या माध्यमातून नागपूरकरांची मान गौरवाने उंचावली आहे. ब्लंकेट हा चित्रपट हिंदी आणि मराठी द्विभाषिक असून यात प्रामुख्याने वैदर्भीय मराठी भाषेची छाप आहे. दिल्लीत होणाऱ्या फिल्म समारोहात या चित्रपटाचे प्रदर्शन वि. आर. सेक्शन मध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. १६ ते २१ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या ह्या चित्रपट महोत्सवात जगातील २०० चित्रपटांची ऑनलाईन प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Mohit Nirmal Director

ब्लंकेट (कंबल), शेतकरी कुटुंबांवर आधरित एक वास्तविक कथा आहे, थंडीत पडलेल्या अकाळी पावसामुळे दोन्ही वृद्ध आजी-आजोबांना प्रचंड थंडी वाजू लागते आणि त्याच क्षणापासून त्यांच्या आयुष्यात अनेक प्रसंग वादळ म्हणून येतात. त्यामध्ये आजी-आजोबा व त्यांच्या नातवाची भावनिक घुसमट होते आणि वेळोवेळी त्यांच्या भावनिक वेदना झिरपत निघतात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लोकस्पर्श शी संवाद साधतांना मोहित निर्मला सांगतात कि, चित्रपटाशी निगडीत कुठलेही कुशल प्रशिक्षण न घेता पहिल्यांदाच फिचर फिल्म सिनेमा करण्याचा प्रवास एक लेखक व दिग्दर्शक म्हणून अजिबात सोपा नव्हता. यासाठी त्यांना प्रचंड मेहनत आणि तेवढाच सिनेमाचा खोलवर अभ्यासही करावा लागला. दिर्घकाळ मुंबई मध्ये सॉफ्टवेअर इंजीनीअर म्हणून नौकरी करत असतानाच त्यांनी ह्या गोष्टींच्या तळागाळात जायला सुरुवात केली आणि तब्बल ४ वर्षाचा कॉर्पोरेट प्रवास संपवून नागपूर ला परत येऊन, २०१८ वर्षी पासून ब्लंकेट हा चित्रपट बनवायला सुरुवात केली. आजच्या व्यावसायिक चित्रपटाच्या काळात वास्तववादी, आर्ट सिनेमा किंवा समांतर सिनेमा निर्माण करणे त्यांना एक सुवर्णसंधी वाटते आणि ह्याच संधीच सोन विदर्भातील नवीन फिल्म निर्मात्यांनी सुद्धा केले पाहिजे असे ते सांगतात.

ब्लंकेट चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन मोहित निर्मला यांनी त्यांच्या डार्क पिक्चर्स स्टुडीओज कंपनीच्या माध्यमातून केले आहे. समांतर, आर्ट, वास्तववादी चित्रपट तसेंच कमरशीयल चित्रपट दर्शकांपुढे घेऊन येणे हे या कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मुख्य निर्माता म्हणून चित्रपटाचे संपूर्ण प्रोडक्शन डार्क पिक्चर्स स्टुडीओज कंपनीने केले आहे. सहाय्यक निर्माता मिलिंद कुलकर्णी यांच्या फाईव फिन्गर्स फिल्म प्रोडक्शन कंपनीत फिल्म चे पोस्ट-प्रोडक्शन उत्कृष्ट पद्धतीने संपन्न झाले आहे. मुख्य भूमिकेत वरिष्ठ कलाकार महेश रायपूरकर आणि सुनंदा साठे आणि इतर भूमिका साकारतांना नागपूरचे अनेक नामवंत कलाकार यांच्या यात समावेश आहे. खालील वेबसाईट च्या आधारे डेलिगेट नोंदणी करून फिल्म बघता येईल.
https://filmbazaarindia.com/
https://www.daarkpicturesstudios.com/

 

(हे पण वाचा:- कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; पंतप्रधान म्हणाले, ‘दवाई भी, कड़ाई भी’ )

 

Comments are closed.