Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यातील पोलिसांचा गणवेश बदलणार?

माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांची सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 17 जानेवारी:- पोलीसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा आहे. त्यामुळे गणवेशात बदल करावेत अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करू. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी करू असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. राज्यातील पोलिसांचा गणवेश बदलणार असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. पोलिसांच्या गणवेशात बदल झाल्यानंतर गणवेशात हाफ जॅकेटचा समावेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय लेदर बुटांऐवजी काळ्या रंगाचे स्पोर्ट शूज पोलिसांच्या गणवेशात दाखल होणार आहेत. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसांचा गणवेश गैरसोईचा असल्याची सूचना माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी दिली आहे.  काही वर्षांपीर्वी पोलिसांच्या टोपीत बदल करण्यात आले होते. तर आता पोलिसांचा पूर्ण गणवेश बदलण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यासंबंधी अनिल देशमुख आणि गृहराज्य मंत्री सतीश पाटील यांनी पोलीस दलातील माजी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. त्यामुळे येत्या काळात खाकी वर्दीला झळाळी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Comments are closed.