Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहमदनगर जिल्ह्यात उमेदवारापेक्षा ‘नोटा’ ला सर्वाधिक मतं, विजयी सदस्य कोण?

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहमदनगर, दि. १९ जानेवारी: खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांना सपशेल नाकारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच ‘नोटा’ (NOTA – None of the above) हे बटण पाचशेहून अधिक मतदारांनी दाबलं. कुठल्याही उमेदवारापेक्षा जास्त मतं ‘नोटा’ला मिळाली. आता विजयी सदस्य कोण घोषित होणार, हा प्रश्न सर्वच उमेदवारांना पडला होता. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियम सांगत संभ्रम दूर केला.

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये ही आगळी वेगळी लढत पाहायला मिळाली. निवडणुकीत मतदारांनी नोटा बटणालाच अधिक पसंती दिली. उमेदवार शीतल सुग्रीव भोसले यांना 396 मतं मिळाली. तर ‘नोटा’ला चक्क 502 मतं पडली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निवडणूक नियम काय सांगतो?

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतं असतात, त्या ठिकाणी ‘नोटा’नंतर सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. त्यानुसार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवार शीतल भोसले खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांनी ही माहिती दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.