Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: नक्षलवाद्यांनी जंगलात साठवून ठेवलेले स्फोटक साहित्य पोलिसांनी केले जप्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

1.14 लाखाच्या जुन्या 500 रुपयाच्या नोटा जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोंदिया, दि. 25 जानेवारी: नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेल्या स्फोटक साहित्यासह जुन्या पाचशे रुपयाच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहे. 24 जानेवारी रोजी उमरपायली-जुनेवाणी रोड लगतच्या पहाडीवर जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उमरपायली-जुनेवाणीरोडच्या लगत पहाडीवर जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी काही साहित्य साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगलात सर्च ऑपरेशन राबवून युरिया खत, 50 ग्रॅम निरमा, कॉस्टीक सोडा, एक स्विच बटन, लाल रंगाची इलेक्ट्रिक वायर 10 फूट, गंधक 10 ग्रॅम, एक कापूरवडी, एक जुनी भरमार बंदूक (सिंगल बोर) आदी स्फोटके व 4 लाख 40 हजार रुपये किमतींच्या जुन्या 500 रुपयांच्या नोटा जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकूल, केशोरीचे ठाणेदार संदीप इंगले, पोलिस उपनिरीक्षक मुंडे, पोलिस उपनिरीक्षक नागरे, सी-60 कमांडो पथक नवेगांवबांध, बीडीडीएस पथक गोंदियाच्या अधिकारी और कर्मचार्‍यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.