Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतीय प्रजासत्ताकदिनी कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा

Get real time updates directly on you device, subscribe now.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व अभिनेत्री मीरा जोशी यांची प्रमुख उपस्थिती

360 एक्सप्लोरर मार्फत विश्वविक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोलापुर डेस्क 26 जानेवारी:- भारतीय प्रजासत्ताक दिनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर ने विक्रम केला असून हरिश्चंद्रगड गडावरील कोकणकड्यावर 73 फुटी तिरंगा फडकवून राष्ट्रगीताचे गायन केले आहे. मराठी चित्रपट तारका मीरा जोशी व आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आनंद बनसोडे हे ही या मोहिमेत सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन जवळपास 45 लोकांनी या मोहिमेत सहभागी होऊन विक्रम नोंदवला आहे. नंदुरबार, धुळे, उस्मानाबाद, सोलापूर, नाशिक, नगर, पुणे, मुंबई, नांदेड येथील 45 लोकांनी 3 दिवसांच्या या ट्रेकिंग मोहिमेत सांधण दरी व हरिश्चंद्रगड सर करून 26 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता 73 फुटी तिरंगा फडकवला.

“प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण असून कोकणकड्यावर तिरंगा फडकवताना अतिशय अभिमान वाटला. 360 एक्सप्लोरर मार्फत अश्या अनेक मोहीमा आयोजित करून साहसी खेळाच्या प्रसारासाठी काम करण्याचा मानस आहे. ही मोहीम युनायटेड नेशन्स च्या गोल्स साठी समर्पित होती.”

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.