Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2020 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 28 जानेवारी :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2020 ते 31 डिसेंबर, 2020 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने, नियम व अटी dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2021 असा आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुरस्कारांची नावे – सर्व पुरस्कारासांठी 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर), बाबूराव  विष्णू  पराडकर  पुरस्कार  (हिंदी)  (राज्यस्तर), मौलाना अबुल  कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर), यशवंतराव  चव्हाण  पुरस्कार शासकीय  गट  (मराठी)  (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर), पु.ल.देशपांडे उत्कृष्ट  दूरचित्रवाणी  वृत्तकथा  पुरस्कार (राज्यस्तर), लाराम कुकरेजा  उत्कृष्ट वृत्तपत्र  छायाचित्रकार  पुरस्कार  (राज्यस्तर), केकी  मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर), समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर), स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर), पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर).

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.