Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Budget 2021 : मोठी बातमी- LIC चं खाजगीकरण होणार!

एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल असं सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 01 फेब्रुवारी:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर देशातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांसह सगळ्यांच्या नजरा होत्या. निर्मला सीतारमण यांनी बजट अर्थसंकल्प सादर करताना एलआयसीचा आयपीओ आणण्याबाबत घोषणा केली आहे. एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल असं सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याचप्रमाणे आयडीबीआय बँकेचे खासगीकरण करण्यासंदर्भातील घोषणाही निर्मला सीतारमण यांनी केली. निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारीत मांडलेल्या अर्थसंकल्पात प्राथमिक विक्रीद्वारे एलआयसीमधील सरकारी भागभांडवलाची अंशत: विक्री करण्याची घोषणा केली होती. या वर्षी या विक्रीला सुरुवात होणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.

दोन बँका आणि एक आयुर्विमा कंपनीमधील निर्गुंतवणूक सरकारकडून केली जाणार आहे. एलआयसीचा आयपीओ यंदा बाजारात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. एलआयसी आणि आयडीबीआयमधील निर्गुंतवणीकरण करुन सरकार 90 हजार कोटी रुपये उभे करण्याचं उद्देश सरकारने समोर ठेवल्याचं निर्मला सीतारमण यांनी 2020चा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. त्याचबरोबर इतर निर्गुंतवणूकीकरणाच्या माध्यमातून 1.2 लाख कोटी सरकार उभे करणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं होतं. यासाठी सरकार बीपीसीएल, कंटेनर कॉर्परेशन ऑफ इंडिया, शिपिंग कॉर्परेशन ऑफ इंडिया अ‍ॅण्ड एअर इंडिया या कंपन्यामध्ये यंदाच्या वर्षात निर्गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.