Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपुर – महावितरण परिमंडळामार्फत पर्यावरण बचाव व महाकृषिधोरण ऊर्जासाठी सायकल रॅॅलीचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपुर, दि. 3 फेब्रुवारी: महाकृषी उर्जाधोरण 2020 अभियान- वीजबिल भरण्यासंबंधी जनजागृती होण्यास तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यास तसेच निरोगी जीवनासाठी सायकल चालविण्याचे महत्व महावितरण चंद्रपूर परिमंडळद्वारे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाकृषीउर्जा धोरण 2020 अभियानांतर्गत विविध योजनाची इत्यंबूत माहिती बद्दल जनजागृती होण्यासाठी तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासंबंधी जागृती होण्यास व वाहनांच्या संख्येमुळे होणार्या वाहतूक कोंडीवर सायकलींच्या माध्यमातून पर्याय साधण्याच्या, उर्जास्त्रोतांचे संवर्धन, महाकृषीउर्जा धोरण 2020 च्या माध्यमातूनच म्हणजेच शेतकरी बांधवांना सुधारीत थकबाकीवर व्याज व दंड माफ होवून थकबाकीमुक्त होण्याच्या योजनेबददल जनजागृती होण्यास व निरोगी जीवनासाठी सायकल चालविण्याचे महत्व विशद करून देणे या उधिष्टासह आज महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देषपांडे यांच्या पुढाकाराने महावितरण चंद्रपूर परिमंडळाद्वारे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

महावितरणला भेडसावत असलेल्या थकबाकीच्या समस्येवर ग्राहकांना आवाहन करून वीजबिल भरण्यासंबंधी याप्रसंगी आवाहन करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी सायकल चालवित सदर रॅलीचे नेतृत्व करीत रॅलीची सुरुवात झाली. पुढे ही रॅली स्थानिक अंचलेश्वर गेट, गिरनार चैक, गांधी चैक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चैक, वाहतूक कार्यालय मार्गे महावितरणच्या उर्जानगर उपकेंद्रात पोहचले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.