Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजाराम-खाँदला बस सेवा सुरू करण्याची पं.स. सभापती भास्कर तलांडे यांची निवेदनातुन मागणी

शालेय विद्यार्थी व प्रवाशांची होत आहे गैरसोय.

वेळीच प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

सचिन कांबळे, उपसंपादक लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राजाराम-खाँदलासाठी बस सेवा सुरु करण्यात यावी. या मागणीसाठी अहेरी आगर विभागाचे व्यवस्थापक यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थी तसेच प्रवासी आरोग्य या प्रमुख गरजा आहेत. त्यासाठी लवकरात लवकर बस चालू करण्यासाठी निवेदन दिले आहे.
भास्कर तलांडे, सभापती- पंचायत समिती अहेरी

गडचिरोली दि .०६फ़ेब्रुवारी :- अहेरी तालुक्यात आजही अनेक दुर्गम भागात रस्ते  व गाव असूनही परिवहन मंडळाच्या बसचे आगमन झाले नाही. वेळोवेळी दुर्गम भागातील नागरिकांनी ग्रामसभा मार्फत ठराव पारीत करून शालेय विद्यार्थी तसेच प्रवाशांसाठी सुखकर होईल. अशी अपेक्षा ठेवून राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनही आजही स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही लालपरी ग्रामीण भागात दळणवळणाची सोय असूनही दुर्लक्षीत आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी मानव मिशन अंतर्गत बस सेवा सुरु केली होती. त्याच्या फायदा विद्यार्थ्यांसह प्रवाशांनाही झाला होता. मात्र कोरोना लाॅॅकडाऊन पासून बंद असलेली सेवा मोठ्या शहरात सुरु झाली असली तरी ग्रामीण भागात दुर्लक्षित आहे.

राजाराम-खाँदला या भागात अनेक मोठे गाव आहेत. यासोबतच पोलीस मदत केंद्र, आरोग्य केंद्र, शाळा असल्याने याठिकाणी अनेक वर्षापासून अहेरी परिवहन महामंडळाची बस सुरळीतपणे सुरु होती. याचा फायदा गोलाकर्जी-राजाराम-कमलापूर-रेपनपल्ली या गावांना होत होता. मात्र रस्त्याचे कारण सांगून आजही या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. सदर या मार्गांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय विद्यार्थी व प्रवाश्यांना तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयीन कामासाठी आवागमन करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस शिवाय खाजगी बस, टॅक्सी या सोयी अल्प प्रमाणात आहेत. आणि या खाजगी वाहनाने प्रवास करावे म्हटल्यास दाम दुप्पट देऊन वाहनात कोंबून जावे लागते. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.  

राज्य शासनाने 23 नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावी पर्यतचे वर्ग सुरू केले आहे आणि दुसऱ्या टप्प्यात 27 जानेवारी पासून पाचवी ते आठव्या वर्गा पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहे.  त्यामुळे शाळा, महाविद्यालय सुरु झाल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शहरातील अहेरी-आलापल्ली या ठिकाणी मानव मिशनच्या बसने जाणे येणे सोपे झाले होते. मात्र मानव मिशनची ही बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाने येणे करण्यास मोठा खोळंंबा निर्माण झाला आहे.

राजाराम-खांदला-छल्लेवाडा परिसरातील नागरिकांना दैनदिन कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. आणि त्यासाठी जाणे येणे करण्यासाठी बस नसल्याने तालुक्याच्या कार्यालयात बस स्थानक किंवा मिळेल त्याठिकाणी रात्र काढावी लागत आहे. यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून सुरळीत बस सेवा सुरु करण्यासाठी नागरिकांच्या वतीने राजारामचे सामाजिक कार्यकर्ते अँड.एच.के.आकदर,आविसचे सल्लागार अशोक येलमूले, श्रीनिवास राऊत,पुनेश कंदीकुरवार,संजय गोंडे यांच्या उपस्थितीत प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली आहे.

Comments are closed.