Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पाणी पातळी वाढल्याने अनेकजण वाहून गेल्याची भीती.गंगा नदी किनाऱ्यावर अलर्ट जारी.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क:

वृत्तसंस्था: हरिद्वार 7 फेब्रुवारी

उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Water level in Dhauliganga river rises suddenly following avalanche near a power project at Raini village in Tapovan area of Chamoli district.

Comments are closed.