Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेळीपालन :पशू वैद्यकीय अधिकारी डॉ महेश कापगते यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली:-11फेब्रुवारी

शेतीला उद्योगधंदा मानून शेतीला पुरक  व्यवसाय म्हणून शेळीपालनाची साथ मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत होईल यात शंका नाही असे प्रतिपादन पळसगांव येशील पशूवैद्यकीय अधिकारी डॉ महेश कापगते यांनी केले ते ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजीत आणि बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था ( आरसेटी ) गडचिरोली यांच्या पळसगाव येथे दहा दिवसीय शेळी पालन ह्या प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमूख अतिथी म्हणून बोलत होते .

यावेळी कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम , परीक्षा नियंत्रक पी डी काटकर , ३५ नव उद्योजक तथा गावकरी उपस्थित होते.
  संस्थेचे संचालक चेतन वैद्य , उमेदचे हेमंत पित्तुलवार , भास्कर सेलोकर , गणेश मातेरे यांचे उपस्थितीत उद्घाटन पार पडले.
दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ महेश कापगते , चामोर्शी येथील पशू वैद्यकीय अधिकारी डॉ मुकेश कापगते , कांचन नंदनवार , उमेदचे गोविंदा राऊत यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले . समारोपीय कार्यक्रमात प्रशिक्षणार्थांची दुरस्थ पध्दतीने अहमदनगर येथील डॉ महेश्वर गुंड यांनी परीक्षा घेतली आणि सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थ्याना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आली ,
आरसेटी पूढील दोन वर्ष प्रशिक्षणार्थाच्या पाठीशी राहून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम यांनी केले .
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन हेमंत मेश्राम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी भास्कर सेलोकर, गणेश मातेरे , लिलाधर कोसरे यांनी अथक परिश्रम घेतले .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.