Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देसाईगंजच्या नगरसेवकांचे दारूबंदीला समर्थन

Get real time updates directly on you device, subscribe now.

शासनाकडे दारूबंदी मजबूत करण्याची मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली दि ११फ़ेब्रुवारी : देसाईगंज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व उपाध्यक्षसह संपूर्ण नगरसेवकांनी जिल्हा दारूबंदीला समर्थन दर्शवित गडचिरोलीची दारूबंदी मजबूत करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. दारूबंदीचे फायदे लक्षात घेता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रत्येक वार्डातील नगरसेवक प्रयत्न करीत आहेत.सोबतच दारूमुक्त निवडणुकीचा संकल्प देखील यांनी केला आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. दारुबंदीमुळे जिल्ह्यातील  दारु कमी झाली आहे. दारूबंदीमुळे स्त्रियांचा व जनतेचा फायदा झालेला आहे. ऐतिहासिक दारूबंदी टिकून राहावी यासाठी  राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. सोबतच जिल्ह्यातील हजाराहून अधिक गावांनी ठराव घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दारूबंदी कायम ठेवण्याची विंनती केली आहे.  जिल्ह्याच्या दारूबंदीला व येणारी निवडणूक दारूमुक्त व्हावी यासाठी देसाईगंज नगर परिषदेच्या २१ म्हणजेच संपूर्ण नगरसेवकांनी समर्थन दर्शविले आहे. महाराष्ट्र शासनाने कोणत्याही स्थितीत गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठवू नये. उलट दारूमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती करावी, अशी देखील मागणी केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शहराच्या नगराध्यक्षा शालुताई दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगरसेवक किशन नागदेवे, हरीश मोटवानी, दीपक झरकर, राजू जेठानी, किरण रामटेके, नरेश विठलाणी, शाम उईके, मोहम्मद खनानी, सचिन खरकाटे, गणेश फाफट, मनोज खोब्रागडे, नगरसेविका हेमा कावळे, रिता ठाकरे, आशाताई राऊत, उत्तरा तुमराम, फहमिदा पठाण, भाविका तलमले, करुणा गणवीर, अश्विनी कांबळे या २१ नगरसेवकांनी दारूमुक्त निवडणूक व जिल्हा दारूबंदीला समर्थन दर्शविले आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.