Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अपहरण करून मुलीची दीड लाखात विक्री

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि. १३ फेब्रुवारी: नृत्याच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनींचे अपहरण करून तिचे दीड लाखात विक्री करण्यात आली. पोलिसांनी दोन महिलांसह सात जणांविरुद्ध अपहरण, विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत महिलेसह दोघांना अटक केली.

रोमा उर्फ शोभा पाटील व अजय हाटे, अशी अटकेतील अपहरणकर्त्यांची नावे आहेत. पोलीस करण, मंगला, संतोष ठाकूर (रा. इंदूर), अंतरसिंग मेवाड व चंदरसिंग मेवाड यांचा शोध घेत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पीडित मुलगी रोमाला ओळखते. मुलगी पाचपावली भागात राहते. ती नृत्य कार्यक्रमात भाग घेते. जानेवारीत ती भंडारा येथे नृत्याच्या कार्यक्रमाला गेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर मुलगी भंडारा बस स्थानकावर गेली. या दरम्यान रोमा तिला भेटली. मध्यप्रदेशातील इंदूर व भोपाळ येथे नृत्याच्या कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्यास दहा हजार रुपये मिळतील. असे आमिष रोमाने तिला दाखविले. त्यानंतर रोमा व तिचे साथीदार मुलीला घेऊन इंदूर ला गेले. तेथून तिला शहाजापूर जिल्ह्यातील मुरादाबाद येथे नेले. तेथे दीड लाख रुपयांमध्ये मुलीची मेवाड याला विक्री केली. रोमा व तिचे साथीदार नागपुरात परतले. दरम्यान, मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. भंडारा पोलिसात तक्रार दिली. भंडारा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.

पोलिसांनी शहाजापूर येथून मुलीची सुटका केली. तपासादरम्यान या अपहरणाची सुरुवात यशोधरानगर भागातून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हे प्रकरण यशोधरानगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी शोध घेऊन रोमा व अजय ला अटक केली. दोघांची 13 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली. रोमाने अजय सोबत दुसरे लग्न केले अशी माहिती पोलिसांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.