Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

1500 स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधण्यासाठी आता परवानगीची आवश्यकता नाही; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

औरंगाबाद, 13 फेब्रुवारी: आता राज्यात 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत  घर बांधण्यासाठी कसल्याही परवानगीची आवश्यकता भासणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या घर बांधण्याचा विचार करणाऱ्या लोकांचा सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचा त्रास वाचणार आहे. ही घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी म्हटलं की, ’31 डिसेंबर 2020 पर्यंतची सर्व बांधकामं नियमित होतील. त्याचबरोबर येथून पुढे जर 1500 स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधायचं असले तर महापालिकेच्या परवानगीची गरज भासणार नाही.’ नगरविकास विभागाच्या या निर्णयामुळे अनेक छोट्या ग्राहकांचा सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याचा त्रास वाचणार आहे. याचा फायदा राज्यातील 55 हजार कुटुंबांना फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त 3 हजार स्क्वेअर फूटपर्यंत घरं बांधणाऱ्यांसाठी 10 दिवसांत परवानगी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी त्यांनी म्हटलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याव्यतिरिक्त, राज्यातील शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिल प्रकरणीही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यात सध्या वीजबिल थकीत केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे वीज खंडित करण्यात आले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांशी बोलणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय आहे.

त्याचबरोबर त्यांनी या पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात विधान करणं टाळलं आहे. या घटनेची संपूर्ण माहिती मला नाही. त्यामुळे पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच याबाबत बोलेल असंही त्यांनी म्हटलं आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण सध्या राज्यात गाजत असून याप्रकरणात शिवसेनेच्या संजय राठोड यांचं नाव समोर आलं आहे. हा मुद्दा संवेदनशील असून यावर आताच काही विधान करणं उचित ठरणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.