Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

छत्रपती शिवाजी महाराजांची 9 फुटांची रांगोळी; आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

हिंगोली, दि. १९ फेब्रुवारी: हिंगोलीत रांगोळीतून छत्रपती शिवाजी महाराजांची नऊ फुटांची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातील विद्यार्थीनी व कला शिक्षकांनी ही प्रतिमा साकारली आहे.

संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. याच जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम देखील राबवले जात आहेत, अशाच परिस्थितीत कळमनुरी तालुक्यातील कवडा येथील सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातील विद्यार्थीनी व कला शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची नऊ फुटाची प्रतिमा रांगोळीतून हुबेहूब साकारली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येऊ नये असे सरकार आणि प्रशासनाचे आदेश असल्यानंतर साध्या आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने जयंती साजरा करण्याचा हा प्रयत्न जिल्ह्यामध्ये कौतुकाचा विषय ठरतोय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.