Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डोंबिवली मधील 80 वर्षाच्या आजींना ढकलून मंगळसूत्र खेचण्याचा निष्फळ प्रयत्न

Get real time updates directly on you device, subscribe now.

घटना सीसीटीव्ही मध्ये कैद….

डोंबिवली, दि. २३ फेब्रुवारी: एमआयडीसी निवासी विभागातील मिलापनगर येथे एका बंगल्याचा आवारात सोमवारी सकाळी साडे दहा सुमारास 80 वर्षाच्या आजींना ढकलून मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न झाला मात्र तो फसला. सदर घटना सीसी कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेची तक्रार स्वतः सुहासिनी परांजपे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन दिली आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

80 वर्षाच्या सुहासिनी परांजपे आणि त्यांचे पती शरदचंद्र परांजपे 85 वर्षे हे आपल्या बंगल्याचा आवारात बागकाम करीत होते. त्यावेळी स्कूटरवरून आलेल्या एका व्यक्तीने काही वेळ त्यांचा घरासमोर येऊन पाहणी केली. त्यानंतर बंगल्याचे कंपाऊंडचे बंद गेट उघडून आत येऊन गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला आजींंनी विरोध केला असता त्या चोरट्याने आजींना ढकलून देऊन पळला.तात्काळ शरदचंद्र परांजपे त्याचा पाठलाग केला परंतु सदर चोरटा स्कूटर वरून पळून गेला. या घटनेत सुदैवाने या वृध्द महिलेला खरचटण्या पलीकडे गंभीर दुखापत झाली नाही. सदर घटना बाजूचा बंगल्यातील सीसी कॅमेऱ्यात कैद झाली असून मानपाडा पोलिस या चोरट्याला पकडतात का हे पाहावे लागेल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.