Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जोगीसाखरा रामपुर फाट्यावर भिषण अपघात;एका महीलेचा रुग्णालयात मृत्यु, एका लहान मुलिसह तिनं जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २६ फेब्रुवारी: आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा रामपुर फाट्यावर टॅक ने मोटार सायकल ला दुपारी तिनंच्या सुमारास धडक देऊन एका चार वर्षांच्या मुलिसह चार जण तीन  वाजताच्या सुमारास भिषण अपघात होऊन जखमी झाले असता आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारा दरम्यान ६५ वषीय महीलेचा मृत्यू झाला तिनं जनांना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जोगीसाखरा येथील लालाजी मेत्राम यांच्या मुलीच्या लग्न समारंभासाठी चद्रपुर जिल्ह्यातील मांगली येथील कालीदास मेश्राम वय ५५ कालीद्रा कालीदास मेत्राम. वय ५० चंद्रभागा महादेव मेत्राम चिचगाव वय ६५ चैताली पुण्यवान संहारे, वय ४. येऊन लग्न समारंभ आपटुन हिरो पेडर मोटारसायकल ने जोगी साखरा गावावरुन आरमोरीकडे जात असता रामपुर फाट्यावर आरमोरी वरुण जोगी साखरा येथील धान्य व्यापारी यांच्याकडे धान नेण्यासाठी येणाऱ्या टाटा ट्रक एम एच ३४AB6114 ने धडक देऊन तिनं वाजताच्या सुमारास भिषण अपघात झाला यात एका लहान मुलींसह एक पुरुष दोन महीला जखमी झाल्याची माहीती राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा जोगी साखरा ग्रामपंचायत चे उपसरपंच संदिप ठाकुर गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव  दिलीप घोडाम. राजकुमार भोयर यांना माहीत होता घटनास्थळी जाऊन स्वत: १०८ ची  गाडी बोलावून आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. यात उपचारा दरम्यान चंद्रभागा महादेव मेश्राम या ६५ वर्षीय महीलेचा मृत्यू झाला. तर बाकी एक लहान चार वर्षांच्या मुलिसह एक पुरुष, एका महीलेला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. 

जखमिच्या नातेवाईना चंद्रपूर जिल्ह्यातुन दुरध्वनी वरुण स्वत: बोलावून उपचारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरमोरी चे तालुका अध्यक्ष संदीप ठाकुर व गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम डॉ. संजय ठेगरी यांनी आथीक मदत केली.  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अधिक तपास आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिगाबर सुर्यवंशी करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.