Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाडीबीटी पोर्टलवर बियाणे या घटकासाठी शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास सुरुवात

महाडीबीटी पोर्टल योजना: अर्ज एक, योजना अनेक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १० मे : महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरीता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांची शेती निगडीत विविध बाबींकरीता अर्ज करावयाचा आहे.

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या शिर्षकाअंतर्गत “बियाणे” या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थींनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून १५ मे २०२१ पर्यंत शेतकऱ्याने अर्ज करणे बंधनकारक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.

“वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेवून शकता. तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास [email protected]  या ई-मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

हे देखील वाचा : 

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या दोन महिला ठरल्या वाघाच्या बळी

स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे काम करून ‘ती’ करते कुटुंबाचा उदरनिर्वाह

अहेरीतील अनाधिकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय सील

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.