येत्या काही दिवसात 70 रेल्वे स्टेशनला विमानतळाचं स्वरुप प्राप्त होणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

जालना, दि. ६ मार्च :  येत्या काही दिवसात ७० रेल्वे स्टेशनला विमानतळाचं स्वरुप प्राप्त होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. जालन्यात कलश सिड्स येथे केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी रावसाहेब दानवे बोलत होते.

यावेळी केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड देखील उपस्थित होते. रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी १२ हजार कोटी रुपयांचं पॅकेज असून रेल्वे स्टेशनला विमानतळाचं स्वरुप प्राप्त होणार आहे. यात पहिल्या टप्प्यात ७० रेल्वे स्टेशन असणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली असून त्यात विटी स्टेशन, मुंबई सेंट्रल, दादर, औरंगाबाद आणि जालन्याचाही समावेश असल्याचं दानवे यांनी म्हंटलंय.

हे देखील वाचा : 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

अनैतिक संबंधातून प्रियकराने केला प्रियसीच्या पतीचा खून…

शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक संघटनेची सभा पडली पार..

 

 

 

lead newsraosaheb danve