बस आणि ट्रकची समोरासमोर धडक.

जीवितहानी टळली.

चंद्रपूर दि २ जुलै :-  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस व खाजगी ट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले, मात्र जीवितहानी झाली नाही. सदर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी आष्टी महामार्गावर आज दिनांक 2 रोजी (शनिवार) सकाळी 9 वाजता ए. जी. कन्स्ट्रक्शन कंपनीसमोर घडली.

हे देखील वाचा,

https://loksparsh.com/top-news/gadchiroli-bhopalpatnam-national-highway-except-nandigaon-fork-connect-sironcha-bus-stand/27133/

अहेरी येथून नागपूरला जाणारी बस क्रमांक एम एच 40 ए क्यू 6395 व विरुद्ध दिशेने येणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम एच.34 बी.झेड. 1252 या दोन वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. सध्या या मार्गावर बांधकाम सुरूअसून रस्ता दुभाजक न लावल्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे.

सदर कामाच्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असून कामात झालेली दिरंगाई त्यासाठी कारणीभूत असल्याचे  सांगितले जात आहे. यापूर्वी या मार्गावर अशा प्रकारचे अनेक अपघात झाले, मात्र संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. बस चालक हा गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील मानपल्लीवार असून ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झालेला आहे. गोडपिपरी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास आहे करीत आहे.

हे देखील वाचा- https://loksparsh.com/news/udaipur-connection-of-amravats-umesh-kolhe-murdered/27129/

asthi policegondpipari policeNITIN GADKARIRoad accident