Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेमडेसिविर इंजेक्शन्स चा काळा बाजार करणाऱ्यांना अटक करून दोन रेमडेसिविर केले जप्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

लातूर दि २७ एप्रिल :स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसापासून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या इसमांच्या मागावर पोलीस होते. आज रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्याचे कोविड १९ परिस्थितीमध्ये काही लोक लातूर शहरात रेमडीसिविर इंजेक्शन्स चा काळाबाजार करून जास्त किमतीमध्ये रेमडीसिवीर इंजेक्शन्स विक्री करत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अशा काळाबाजार करणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव ,डीवायएसपी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, संपत फड , सुधीर कोळसुरे , बालाजी जाधव , नाना भोंग, नामदेव पाटील तसेच अन्न व औषधी विभाग चे औषध निरीक्षक श्री सचिन बुगड यांच्या पथकाने शाहू चौकाच्या पुढे आंबेडकर चौकाजवळ अनिकेत माधव तेलंगे वय २० राहणार जानवळ हल्ली मुक्काम नाथनगर लातूर आणि
ओमकार भगवान शेळके वय २६ राहणार आष्टा , हल्ली मुक्काम लातूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन रेमडीसीवीर इंजेक्शन्स किमती 10200 रुपये आणि दोन मोबाईल किंमत २०००० रुपये चे असा एकूण ३०२०० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ,
आरोपी हे सदरचे रेमडीसिविर इंजेक्शन्स प्रत्येकी 25 हजार रुपये दराने गरजू व्यक्तींना विक्री करणार होते या दोघांसह अन्य एका व्यक्ती अशा एकूण तिघा इसमावर पोलिसांनी पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे कलम ४२०,१८८,३४ भारतीय दंड संहिता ,, कलम 3,७ जीवनावश्यक वस्तू कायदा ,, कलम ३ साथरोग नियंत्रण कायदा ,, कलम २६ औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ कलम १८ सी २७ औषधी आणि सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही औषधांची काळाबाजार किंवा चढ्या दराने विक्री करू नये असे आवाहन लातूर जिल्हा पोलिस विभागाने केलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.