Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी केली अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. २५ जून : सतत वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सोसायटीच्या चेअरमनला सोशल मीडियावर शिविगाळ केल्याप्रकरणी, तसेच सोसायटीतील लोकांशी वारंवार भांडणे व चेअरमनला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पायल रोहतगी 20 जून रोजी झालेल्या सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सदस्य नसतानाही सहभागी झाली होती. सोसायटीच्या सदस्यांनी तिला सभेमध्ये सहभागी होण्यास मनाई केल्यानंतर तिने शिविगाळ केली. तसेच सोसायटीमध्ये मुलांच्या खेळण्यावरुनही तिने रहिवाशांसोबत भांडणे केली होती. या प्रकरणी सेटेलाईट पोलिसांनी तिला अटक केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान, पायल रोहतगीला पोलिसांनी अटक करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी राजस्थानमधील बुंदी पोलिसांनी तिला मोतिलाल नेहरू, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणीचा व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी अटक केली होती. युथ काँग्रेसचे नेते चर्मेश शर्मा यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर तिला राजस्थान न्यायालयाने जामिन दिला होता.

सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी वाद ओढवून घेण्याची पायल रोहतगी हिची सवय आहे. याआधीही तिने सती प्रथेचे समर्थन केले होते. तसेच नोबेल विजेत्या मलाला युसुफजाईला अपशब्द बोलून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जातीवर सवाल उपस्थित करून, तसेच कलम 370 बाबत वादग्रस्त विधान करून आणि फूट अॅप झोमॅटोला सेक्यूलर आउटलेट म्हणून वाद ओढवून घेतला होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अभिनेत्री पायल रोहतगी हिची कारकीर्द विशेष बहरली नाही. तिने रिफ्यूजी, तुमसे मिलकर, रक्त, तौबा तौबा, 36 चाइना टाउन, ढोल, अगली और पगली, दिल कबड्डी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. यासह टीव्ही शो बिग बॉस, फियर फॅक्टर इंडिया 2 मध्येही काम केले.

हे देखील वाचा :

महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू, आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ED ची धाड…

गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 26 कोरोनामुक्त तर 19 नवीन कोरोना बाधित

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.