Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हळदी समारंभात एका आदिवासी महिलेला चेटकीण ठरवत तिची अवहेलना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर, दि. १२ जून : पालघर मधील वाडा येथील एका हळदी समारंभात एका आदिवासी महिलेला चेटकीण ठरवत तिची भर समारंभात लोकांसमोर अवहेलना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वाडा तालुक्यातील बिरशेती या गावातील ही घटना असून याच गावातील एका हळदी समारंभात पारंपारिक पद्धतीने कुलदैवतांची पूजा अर्थात देवादेवी सुरू होती. मात्र अचानक भगत असलेल्या दोन तरुणांच्या अंगात वारा आल्याच सांगत त्यांनी या महिलेला मंडपाच्या मध्यभागी उभ करत तिच्यावर भंडारा उधळला. तसंच ही महिला भुताटकी करत असून तिच्या पासून सावध रहा असही लग्नसमारंभातील उपस्थितांना आवाहन केलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या आदिवासी महिलेच्या मानेला पकडून तिच्यावर भंडारा उधळत नारळ फोडला. या सगळ्या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या घटनेनंतर पीडित महिलेने वाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Comments are closed.