Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! मुंबई नंतर अमरावतीत आढळले जिलेटिनसह स्फोटके

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. १९ मार्च:  मुंबईमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घराबाहेर जिलेटिनने भरलेली गाडी आढळल्यानंतर गुरुवारी रात्री ३ वाजता दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकात जिलेटीनसह स्फोटके आढळली आहे आहे.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी केली असता, रात्रीला २ युवक मोटरसायकलने जिलेटीन व स्फोटके नेतानाचा संशय आल्याने पाठलाग केला असता पोलिसांना २०० नग जिलेटीन व २०० नग नॉक डिटोनेर आढळून आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा व तिवसा पोलिसांनी या संदर्भात सखोल चौकशी केली असता यामध्ये २ नावे समोर आली आहे. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय असल्याने या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.