Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर वादग्रस्त गटशिक्षणाधिकारी यांचा प्रभार काढला

  • प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे यांची मागणी.
  • आठ दिवसांत दोनदा अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा २०१५ अन्वये गुन्हा दाखल.
  • एकाच अधिकाऱ्यांकडे अनेक विभाग.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ब्रम्हपूरी, १२ एप्रिल: ब्रम्हपूरी पंचायत समिती येथील शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट मागील पंधरा-वीस दिवसांपासून वादग्रस्त ठरले आहेत. १० मार्च ला गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक सुधारित कायदा २०१५, ३०६ अन्वये ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांना अटक करण्यात आली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कुडेसावली येथे कार्यरत असलेले देवचंद मेश्राम यांनी २ एप्रिल ला पोलिस स्टेशन लगत असलेल्या कोट तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या एका चिठ्ठी मध्ये मला आत्महत्या करण्यासाठी प्रमोद नाट यांनी प्रवृत्त केले असल्याचे दिसून आले. त्यावरून गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट यांच्यासह तिन लोकांवर अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा ३०६ अन्वये ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अनेक भ्रष्ट्राचार व अनियमितता केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आले. पण कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. मात्र गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून ते कार्यालयातुन गायबच झाले.

त्यामुळे शिक्षण विभागाचे कामे खोळंबली आहेत. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण विभाग वाऱ्यावर असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागभीड येथील गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषक आहार अधीक्षक हा प्रभार काढून शिक्षण विस्तार अधिकारी माणिक खुणे व ब्रम्हपूरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकारी अनिल चिलमवार यांना देण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.