Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपिचा वकील न्यायालयात हजर

  • आरोपिकडून दोन वकिलांनी भरले वकिलनामे , एकाची करण्यात आली निवड.
  • आरोपीवर कलम ३०२,३५४ (ड) अन्वये न्यायालयात करण्यात आले दोषारोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा १७ डिसेंबर :- हिंगणघाट जळीत कांड प्रकरणाची  आज दिवाणी न्यायालयात  सूनावणीची कारवाई घेण्यात आली. या सूनवणीमध्ये आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्यावर दोषारोप ठेवण्यात आले. कलम ३०२ व ३५४ ( ड ) अन्वये दोषारोप लावण्यात आले आहेत. आरोपि तर्फे दोन वकिलांनी वकीलपत्र भरले होते. १४ तारखेला आरोपीचे वकील उपस्थित राहिले नसल्याने सुनावली पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार आज हिंगणघाट येथे सुनावणी पार पडली. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यानंतर पुढे साक्षी पुराव्याची कारवाई सुरू होणार आहे. वकिलनामे सादर करणाऱ्या दोन वकिलापैकी एका वकिलाची निवड करण्याची संधी न्यायालयाने आरोपिला दिली. पुढे जानेवारी महिन्यातील ११, १२ आणि १३ जानेवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आरोपिकडून भुपेंद्र सुने यांनी वकीलपत्र सादर केले. वकिलांनी आरोपीची बाजू मांडली. प्रकरणाचा शेड्युल न्यायलायसमोर ठेवण्यात आले. या प्रकरणात आज सरकारी वकील सोईतकर यांनी काम पाहिले. तर पुढील सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार आहेत.

Comments are closed.