Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिवंत विद्युत तारेच्या साहाय्याने वाघाची शिकार?

गोंदियातील रामघाट बीटात आढळला वाघाच्या मृतदेह.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गोंदिया, दि. १३ जानेवारी : अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील रामघाट (क्रमांक १) बीटातील कक्ष क्रमांक २५४- बी मध्ये गुरुवारी दि. १३ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास वाघाच्या मृतदेह आढळून आल्याने वन विभागामध्ये एकच खळबळ माजली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील रामघाट बीटातील कक्ष क्रमांक २५४-बी मध्ये वनकर्मचारी व वन मजूर गुरुवारी सकाळच्या सुमारास जंगल गस्त करतांना त्यांना चक्क वाघाचा मृतदेहच आढळून आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ वाघाचा मृतदेह आढळल्याची माहिती उपवनसंरक्षक व संबंधित वनाधिकाऱ्यांना दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक कुलराज सिंग यांच्यासह वनविभागाचे अधिकारी आणि मानद वन्यजीव संरक्षक मुकुंद धुर्वे, सावन बहेकर हे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. घटनास्थळावर मृतावस्थेत आढळलेल्या वाघाचा जबडा व नखे गायब आहे. तसेच या वाघाची दोन दिवसांपूर्वीच शिकार झाल्याचा वनविभागाच्या वनाधिकाऱ्यानी अंदाज वर्तविला आहे. सदर वाघाची शिकार विद्युत प्रवाहाच्या जिवंत तारेच्या स्पर्शाने केली असावी असा अंदाज घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. वाघाचे शवविच्छेदनानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होऊ शकेल. अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी देखील अशीच शिकारीची घटना घडली असून घटना उजागर झाल्यानंतर अनेक आरोपी ला अटक झाली होती. मात्र आजच्या घटनेनंतर ही वनविभागासमोर एक आवाहन उभे ठाकले असून वन विभागाद्वारे आरोपीच्या शोध सुरु आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

नक्षल्यांनी केली दोन वनरक्षकांना बेदम मारहाण; वनरक्षकांत पसरले भिती व दहशतीचे वातावरण…

रुग्णालयाच्या समोरच तरुणांनी केला डॉक्टरावर बेछुट गोळीबार!

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.