Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवघ्या 24 तासाच्या आत धानोरा पोलीसांनी पळवुन नेलेल्या अल्पवयीन मुलीचा व आरोपीचा लावला शोध

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 31 मे – 27 मे रोजी धानोरा येथील एका अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने फुस लावुन पळवुन नेल्याची घटना घडली होती. अल्पवयीन मुलीच्या आईने दि. 28 मे रोजी पोलिसांना धानोरा येथे तक्रार दिली. आई-वडीलांकडे विचारपुस केले असता तपासा दरम्यान मिळालेल्या एका संशयीत   ईसमाच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशन नुसार आरोपी हा नागपुरवरुन छत्तीसगढ एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करीत असल्याचे दिसुन आले.

नागपुर वरुन मेरठ (उत्तर प्रदेश) येथे जात असल्याची माहिती मिळाली त्यामुळे त्या आरोपी सोबत अप्रहत मुलगी असावी व तो तिला मेरठ येथे घेवुन जात असल्याचा संशय आल्याने पोलसांनी सापडा रचला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री  स्वरुपा नाईकवाडे व  चव्हाण हे शासकिय वाहनाने मेरठ करीता रवाना झाले.मेरठ रेल्वे स्थानकावरुन आरोपी सह मुलीला ताब्यात घेऊन धानोरा येथे आणण्यात आले.आरोपी नामे अनुज पाल, वय 37 वर्षे, रा. मेरठ (उ.प्र.) असून  त्याला  तात्काळ अटक करण्यात आले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करण्यात आलेे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धानोरा पोलीसान कडून अवघ्या 24 तासाच्या आत लावला शोध.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक  नीलोत्पल , अपर पोलीस अधीक्षककुमार चिंता , व उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोस्टे धानोरा स्वप्नील धुळे यांचे नेतृत्वात स्वरुपा नाईकवाडे गुन्हयाचा पुढिल तपास करीत आहेत. यावेळी संपूर्ण जिल्हयातील नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनाबद्दल सावध राहुन जर कोणी असे करीत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ त्यांची माहिती पोलीस विभागाला देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.