Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला पडलं चांगलंच महागात!

औरंगाबादेतील तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार. संबंधित तरुणाने पीडित तरुणीचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर केले अपलोड.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

औरंगाबाद, जानेवारी:  इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित तरुणाने पीडित तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद येथील सीटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मुलीची एप्रिल २०१९  मध्ये इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर पुढे संवाद वाढत गेल्यानंतर, आरोपीनं पीडित मुलीचा विश्वास संपादन केला. ओळख वाढवून तिच्या नातेवाईकांशी मोबाइलवर गोड बोलून घेतले. तसेच तिला फोटो पाठवायला भाग पाडलं. यानंतर आरोपीनं संबंधित फोटो अश्लील पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित मुलीचा मोबाइल हॅक करत सर्व डेटा चोरला. तसेच ‘सोशल मीडियावर होणारी बदनामी थांबवायची असेल तर दोन लाख रुपये दे’ अशी मागणी आरोपीनं पीडितेकडे केली.

यानंतर पीडित तरुणीने सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला आहे. हा प्रकार कळताच पीडित तरुणीच्या वडिलांनी तातडीने सीटी चौक पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इन्स्टाग्रामवरील arbazz_007 नावाच्या प्रोफाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी बार्टीने तज्ज्ञ समिती गठीत करावी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना व सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ – धनंजय मुंडे

 

 

 

Comments are closed.