Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वीज पडून 23 बकऱ्या ठार, शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वर्धा, दि. १० जुलै : वर्धा जिल्ह्यातील गिरड शिवारात आज दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटसह जोरदार पावसाने हजेरी लावली. गिरड येथील बाबा फरीद दर्गा टेकडीवर मनोज फोफारे स्वतःच्या बकऱ्या चारत असताना पाऊस सुरू झाल्याने संपूर्ण बकऱ्या मोठ्या झाडाच्या खाली उभ्या होत्या. यावेळी आकाशात जोरदार वीज कडाडली यात झाडावर वीज कोसळल्याने त्याच्याखाली असलेल्या २३ बकऱ्या जागीच ठार झाल्या. यात काही बकऱ्या सैरावैरा पळून गेल्याने बचावल्या तर बकरी चरण्यासाठी गेलेला मुलगा काही अंतरावर असल्याने थोडक्यात बचावला. यात श्रीराम फोफारे याचे दोन लाखाचे नुकसान झाले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.