Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यांनी केली दोन वनरक्षकांना बेदम मारहाण; वनरक्षकांत पसरले भिती व दहशतीचे वातावरण…

भामरागड वनविभागातील गट्टा वनपरिक्षेत्रातील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, १२ जानेवारी : गडचिरोली वनवृत्तांतर्गत येत असलेल्या भामरागड वनविभागातील दोन वनरक्षकांना विसामुंडी गावालगतच्या जंगल परिसरात नेऊन नक्षलवाद्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी  दि. १२ जानेवारी रोजी समोर आली आहे.

हुकेश आर. राऊत, वनरक्षक विसामुंडी व जागेश्वर एम. चुरगाये, वनरक्षक नारगुंडा अशी जखमींची नावे आहेत. ते दोघेही मंगळवारी (दि. ११) सकाळच्या सुमारास आलेंगा उपक्षेत्रातील नियतक्षेत्र विसामुंडी येथे वनतलावाच्या जागेची पाहणी करण्याकरता गेले होते. यानंतर, गावकऱ्यांसोबत चर्चा करून दुचाकीने परतताना विसामुंडी नाल्याजवळ नक्षल्यांनी त्यांना अडवले. व तुम्ही कोण, या रस्त्याने कसे आले? असे विविध प्रश्न विचारत जंगलात नेऊन झाडाला बांधले व बेदम मारहाण केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नक्षलवाद्यांनी त्यांच्या जवळील साहित्यही हिसकावून घेतले असे वनरक्षकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रुग्णालयाच्या समोरच तरुणांनी केला डॉक्टरावर बेछुट गोळीबार!

प्रवासी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी, एसटीच्या भविष्यासाठी… संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे…! – शरद पवार यांचे आवाहन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.