Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल ने केली एका इसमाची हत्या !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दी, १५ में :नक्षलवादयानी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका इसमाची कु-हाडीने हत्या केल्याची घटना मेंढरी गावामधून जाणाऱ्या रामनटोला मार्गावर दिनांक ,14 मे रोजी उघडकीस आली आहे …

नक्षलवाद्यांनी हत्या करण्यात आलेल्या  इसमाचे नाव रामजी तिम्मा वय ४० वर्ष असून  एटापल्ली  तालुक्यातील पोलीस मदत केंद्र हालेवारा अंतर्गत येत असलेल्या मेंढरी या गावातील रहिवासी आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नक्षलवाद्यांनी हत्या करून मृत शरीराजवळ टाकलेल्या  पत्रकात सदर मृतक  आत्मसमर्पित नक्षल असून पोलिसाँचा खबरी असल्याच्या संशय  व्यक्त केला आहे. मागील झालेल्या घटनेत पोलिसांना सहकार्य करुण एका नक्षल कमान्डरला (काँम्रेडला) मारण्यात मृतकाचा हात असल्याचा उल्लेख टाकलेल्या पत्रात केलेला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षलवाद्यांनी निरपराध इसमाची हत्या केल्याची घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल होवून मोका पंचनामा करून मृतकाची बॉडी ताब्यात घेवून एटापल्ली  येथील  रुग्णालयात शवविच्छेदन करून परिवारला सुपुर्त करण्यात आली आहे .

पोलीस विभागांनी नक्षल्यांच्या मोठ्या कॅलेंडरच्या नेत्यांना ठार केल्यानंतर नक्षल चळवळ ही पोकळी झाली होती तर दुसरीकडे पोलिसांचा दबाव पाहून नक्षल आत्मसमर्पण करू लागले होते . पोलिसांचा वाढता दबाव निर्माण झाल्याने नक्षल हि  “सळो की पळो ” अशी भूमिका नक्षल्यांनी स्वीकारली होती मात्र अचानकच पुन्हा नक्षलवाद्यांनी अतिदुर्गम भागामध्ये हत्या , मारझोड करीत असल्याने सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Comments are closed.