Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा धुमाकूळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रोहा 19 नोव्हेंबर :- रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा मायाजाळ पसरलेला असून असून अनेक जुगारवेडे तरूण यामध्ये गुरफटत चालले आहेत. येथील बेकायदा चक्री जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या चक्री जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.

रोहा शहरातील खैरकर हॉस्पिटलच्या बाजूला व दमखाडी कोर्ट रोड तसेच चित्रकुट आणि आपणा बाजारा जवळ ऑनलाईन चक्री जुगाराचा अड्डा राजरोसपणे सुरू असून या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तातडीने सदरच्या ऑनलाईन चक्री जुगारावर कारवाईचे आदेश देऊन हा अवैध चक्री जुगार बंद करावा अशी मागणी येथील स्थानिक सोसायटीतील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.