Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली ब्रेकिंग: पर्लकोटा नदीच्या नवनिर्माण पुलाच्या बांधकामावर असलेल्या पोकलँडला अज्ञात इसमानी लावली आग!

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • आग लावल्याने विविध चर्चेला आले उधाण.

सचिन कांबळे, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भामरागड, दि. १८ मार्च: पर्लकोटा नदीवर नवनिर्माण पुलाचे बांधकाम करण्यात येत असून रात्री १२.०० च्या सुमारास अज्ञात इसमाने काम सुरु असलेल्या ठिकाणी पोकलँडला जाळण्याच्या प्रयत्न केला आहे.   

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर काम पर्लकोटा नदीच्या पुलाची निर्मिती करण्यासाठी गत एक महिन्यापासून सुरु असून त्याठिकाणी कंत्राटदाराचे अधिकारी, कामगार खोदकाम करण्यासाठी ५ ते ६ जेसीबी, पोकलँड इतर यंत्रणा ठेवण्यात आली आहे. या कामावर रात्री देखरेख करण्यासाठी स्थानिक चौकीदाराची नियुक्ती करण्यात आली असून रात्रीच्या सुमारास स्थानिक चौकीदाराकडून पहारा देण्यात येत असतो. मात्र रात्री चौकीदाराला तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी बाहेर गेले असता त्याच वेळी अज्ञात इसमाने सर्वात शेवटी असलेल्या पोकलँडला आग लावली. हि घटना  चौकीदाराला लक्षात येताच स्थानिक कामावर असलेल्या अधिकारी व कामगारांना माहिती दिली. त्यावेळी कामगाराच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवण्यात आली.

दरवर्षी भामरागड तालुक्यात पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने पर्लकोटा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी ५ ते ६ फिट ओसंडून वाहत असते. त्यामुळे शेकडो गावाचा संपर्क पावसाळ्यात चार ते पाच वेळा तुटत असतो. नवनिर्माण पुलाच्या बांधकामाची मागणी गेल्या २५ वर्षापासून जोर धरून होती. याची दखल प्रशासनाने घेऊन नवनिर्माण पुलाच्या बांधकामाचे प्रत्यक्ष पाहणी करून नवीन पुलाच्या बांधकामाला मंजुरी दिली. नक्षलग्रस्त भागात विकासकामाला नक्षल्यांनी कामाच्या ठिकाणी अडथळा निर्माण करतात. अनेक घटनामध्ये नवनिर्माण कामावरील वाहनांची जाळपोळ करून दहशत निर्माण केली जाते. त्यामुळे दुर्गम भागात कंत्राटदार काम करण्यासाठी धजावत नाही. अशातच सुरळीत चालू असलेल्या नवनिर्माण पर्लकोटा नदीवर बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या जेसीबीला अज्ञात इसमाने आग लावून जाळण्याच्या प्रयत्न केल्याने एकच खळबळ माजली आहे.  हि आग खरच कोणी लावली असेल? हे पोलीस तपासात स्पष्ट होईल. मात्र नक्षलग्रस्त भागात जाळपोळीची घटना झाल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.     

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर घटने संदर्भातील माहिती पर्लकोटा नदीच्या नवनिर्माण बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन भामरागडला तक्रार दाखल केली असून घटनेचा तपास  सुरु आहे. तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

डॉ. कुणाल सोनवणे – उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड      

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.