Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

क्रूरकर्मा आफताब विरुद्ध पुराव्यांसाठी पोलिसांची कसरत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली 17 नोव्हेंबर :- सर्व माध्यमांवर सद्या वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्येचे पडसाद उमटत आहेत. सर्वच राजकिय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी क्रूरकर्मा आफताब पुनावालाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून पोलिसांवर एक सामाजिक दबाव येत आहे. आणि त्यादृष्टीने पोलीस त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सगळ्या पातळीवर पुरावे जमा करण्यासाठी पोलीस तसूभरही कमी करत नाही आहेत.

या धक्कादायक प्रकारानंतर पोलीस यंत्रणा सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी व्यग्र आहेत. आता त्यासाठी सीसीटीव्ही शोधले जात आहेत आणि ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशीचे कपडेही पोलिसांना हवे आहेत. श्रद्धाची हत्या सहा महिन्यांपूर्वी झाली होती. तेव्हापासूनचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना हवे आहेत; पण फुटेजचे बॅकअप केवळ १५ दिवसांचे असल्याचे कळते. त्यामुळे आधीचे व्हिडीओ फुटेज मिळवण्यासाठी टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे. श्रद्धाच्या कपड्यांचाही शोध सुरू असून, आफताबच्या फ्लॅटमधून पोलिसांनी तिच्या कपड्यांची एक बॅग जप्त केली आहे. तिच्या कपड्यांची आणखी एक बॅग पोलिसांना तिच्या वडिलांकडूहवी असल्याचेही समजते. ज्यादिवशी हत्या केली, त्या दिवशी आफताबने सगळे कपडे एका कचऱ्याच्या गाडीत टाकल्याचेही समजते. त्यामुळे हा गुंता आणखी वाढत जाणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आता पोलीस आफताबच्या नार्को टेस्टची तयारी करत आहेत. श्रद्धाच्या बेपत्ता होण्याबाबत, तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटबाबत, तिचा खून नेमका कसा।केला आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे घरात असतानाच मैत्रिणीसोबत केलेली।मजा याबाबत आफताबने पोलिसांची
दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची नार्को टेस्ट करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. आफताबला घटनास्थळी नेऊन गुन्हा।कसा घडला याची रंगीत तालीमही पोलिसांनी केली.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.