कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची गोळी झाडून आत्महत्या… गोंदियाच्या बिरसी विमानतळ परिसरातील घटना..
पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस विभागात उडाली खळबळ...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बिरसी विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे. राकेश भांडारकर (30) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मृतक राकेश आज सकाळी 10 वाजता कर्तव्यावर आला असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्याची ड्युटी होती. मात्र सायंकाळी 4 वाजे दरम्यान राकेश भांडारकर याने स्वतःवर गोळी झाडली असून यातच त्याचा मृत्यू झाला.
Comments are closed.