Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चक्क… दारुड्याने दारूच्या विरहात परमिट रूम फोडून चोरली दारूची बाटली!

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • सोलापुरातील होटगी रोडवरील पुष्करबार मधील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सोलापूर, दि. ९ एप्रिल: सोलापुरातील होटगी रोडवरील एक परमिट रूम फोडून अज्ञात चोरट्याने पाच हजार शंभर रुपये किमतीची दारूची एक बाटली व त्यासोबत अन्य साहित्य असा एकूण १४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या शहरातील सर्व परमिट रूम व वाईन शॉप बंद आहेत. दारू मिळत नसल्याने दारुड्याने चक्क हॉटेल पुष्कर बारच्या पाठीमागील कंपाउंडवरून आत प्रवेश केला. पाठीमागील दरवाजा तोडून हॉटेलमध्ये गेला व तेथे ठेवलेली महागडी पाच हजार १०० रुपये किमतीची दारूची एक बाटली घेतली. त्याव्यतिरिक्त चार हजार ५०० रोख रक्कम, पाच हजार रुपये किमतीचा कॉम्प्युटर चोरून नेल्याने परमिट रुम धारक व वाईन शॉप चालक-मालक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.   

दरम्यान दीपक रामचंद्र मोरे (४३ रा. विजयनगर, नई जिंदगी रोड ) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.