Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन युवकांकडून दोन पिस्टल, १३ जिवंत काडतुस जप्त

वाशीम येथेल नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

वाशीम, 12 जून- वाशीम शहरातील वृंदावन पार्कमधील एका इमारतीतून तीन युवकांकडून एका पिस्टलसह धारदार शस्त्र जप्त करण्याच्या घटनेची शाइ वाळत नाही; तोच शनिवारी सकाळी स्थानिक रविवार बाजारातील पार्किंग परिसरात पिस्टलसह धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या दोन युवकांना पकडण्यात आले. या दोन्ही घटनांमुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंगझडतीत २ देशी बनावटीच्या पिस्टल, १३ जिवंत काडतूस, एक धारदार लोखंडी कत्ता, एक मोटारसायकल व एक मोबाईल
असा एकूण १ लाख २५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर कलम ३, ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधिक  तपास करत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.