Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

 दोन चिमुकले तलावात बुडाले ,पोहणे जीवावर बेतले

दोन्ही मुलांचे मृतदेह लागले हाती...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 चंद्रपूर दि ८ : गोंडपिपरी येथील दिवाणी न्यायालयाच्या मागे असलेल्या तलावात मित्रांसोबत आंघोळ करणे जीवावर बेतले असून यात दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .गौरव विलास ठाकूर (१४) तर शौर्य भास्कर पिंपळशेंडे (१५)  रा.गोंडपिंपरी शिवाजी चौक येथील असून तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

उन्हाळ्याच्या शाळेला सुट्ट्या लागल्या असल्याने व उन्हाचा पारा जास्त असल्याने वार्डातीलच काही मुले फिरायसाठी गेल्यानंतर त्यांना तलावात पोहण्याचां मोह आवरला नाही.चिमुकले पोहण्यासाठी तलावात गेले तेथील काही मुले घरी परतले तर दोघे बुडाले.मात्र भीतीपोटी ईतर चिमुकल्यांनी ही घटना घरच्यांना सांगितली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बेपत्ता मुलांच्या घरच्यांनी शोधाशोध केली असता सर्व मुले पोहण्यासाठी गेल्याचे समजले. कुटुंबीयांनी तलावाकडे धाव घेतली. स्थानिक मासेमारांच्या सहकार्याने शोध मोहीम राबविली असता यात दोन्ही मुलांचे मृतदेह पथकाच्या हाती लागले असून शाव्विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेची माहिती गोंडपिपरीत नागरिकांना होताच शहरात शोककळा पसरली आहे.

हे देखिल वाचा ,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तहसिलदारसह नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; वाळू वाहतूक प्रकरणी लाच घेणं चांगलंच भोवलं

रुपाली चाकणकर यांनी EVM मशीनची केली पूजा; निवडणूक अधिकाऱ्यानेच दाखल केला गुन्हा  

मोदींच्या नेतृत्वाखाली आणणार शिवशाही आणि रामराज्य – नितीन गडकरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.