Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मित्रांच्या मदतीने अल्पवयीन नोकराने लांबविले तीन लाख

कुरखेडा येथील घटना चौघे जन ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : एका जनरल स्टोअर्समध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन नोकराने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने साहील हिरालाल वरलानी (रा. कुरखेडा) यांचे जनरल स्टोअर्स मधून तीन लाख रुपये लंपास केल्याची घटना कुरखेडा शहरात उघडकीस आली असून या प्रकरणाचा उलगडा  पोलिसांनी दोन दिवसांत करून चौघांना ताब्यात घेतले आहे. त्या आरोपीं  मध्ये  तिघे जन अल्पवयीन आहेत. याबाबत साहील वरलानी यांनी कुरखेडा ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.

कुरखेडा शहरातील मुख्य मार्गावरील  साहील हिरालाल वरलानी (रा. कुरखेडा)  यांचे दुकानात दोन दिवसांपूर्वी चोरी झालेली  होती. पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा  त्यांचे दुकानात काम करणारा एक मुलगा दोन दिवसा पासून कामावर आला नाही. त्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडे वळली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने  इब्राहिम इस्राइल कुरेशी (२०, रा. कुरखेडा) व अन्य दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुकानाचे कुलूप तोडून रात्रीच्या सुमारास ३ लाख रुपये लंपास केल्याची कबुली दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसांनी त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून रक्कम हस्तगत केली. उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ, उपनिरीक्षक वर्षा बोरसे, हवालदार शेखलाल मडावी, संदेश भैसारे यांनी ही कारवाई केली.

 

 

Comments are closed.